गुना -पाच वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील ९ जण भाजल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. ही घटना मंगळवारी गुना जिल्ह्यातील एका गावात विवाहित जोडप्याच्या नातेवाईकांच्या वादातून घडल्याची माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेश : पती-पत्नीचा वाद, पाच वर्षीय मुलासह ९ जणांना पेटविले - गुना पती पत्नी वाद बातमी
बिदुरीया गावातील जितेंद्र आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य जितेंद्रच्या सासरी मनशाखेडी गावात पत्नीसोबत असलेला वाद मिटविण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात प्रथम शाब्दिक वाद निर्माण झाला. यावेळी वादातून सासरच्या काही लोकांनी त्यांना पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाच वर्षाच्या मुलासह कुटुंबातील ९ जण गंभीर जखमी झाले.
या घटनेची पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की रघुगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मनशाखेडी गाव हे जितेंद्र केवट यांचे सासर आहे. बिदुरीया गावातील जितेंद्र आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य जितेंद्रच्या सासरी मनशाखेडी गावात पत्नीसोबत असलेला वाद मिटविण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात प्रथम शाब्दिक वाद निर्माण झाला. यावेळी वादातून सासरच्या काही लोकांनी त्यांना पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाच वर्षाच्या मुलासह कुटुंबातील ९ जण गंभीर जखमी झाले.
या घटनेची रघुगड पोलीस ठाण्याचे पोलीस इन चार्ज मदन मोहन मालविय अधिक चौकशी करत आहेत. तसेच जखमी लोकांना उपचारा करता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी लहान मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचीम माहिती समोर आले आहे.