डेहराडून - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. लाखाहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. असे असताना उत्तराखंडमधील एका 9 महिन्याच्या मुलाने कोरोनाशी सामना करत सगळ्यांनाच चकित केले आहे. विशेष म्हणजे उत्तराखंडमधील सर्वात कमी वेळात कोरोनामुक्त झालेला रुग्ण होण्याचा मानही त्याला मिळाला आहे.
17 एप्रिलला कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या मुलाला दून मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. केवळ सहा दिवसांच्या उपचारानंतर हा बालक कोरोनामुक्त झाला. त्याच्या दोन चाचण्या निगेटिव आल्यानंतर रुग्णालयातून त्याला सुट्टी देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून त्याला व त्याच्या आईला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे असे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एल. एस खत्री यांनी सांगितले.