नवी दिल्ली - मागील 24 तासांत देशभरात 37 जणांचा मृत्यू झाला असून 896 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6 हजार 6761 झाली आहे. यातील 6 हजार 39 अॅक्टिव्ह केसेस आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
मागील 24 तासांत 37 जणांचा मृत्यू, तर 896 जणांना बाधा - कोरोना बातमी
मागील दोन दिवसांत देशात 1 हजार 487 नवे रुग्ण आढळल्याने सर्वांपुढील चिंता वाढली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे 516 रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. मागील दोन दिवसांत देशात 1 हजार 487 नवे रुग्ण आढळल्याने सर्वांपुढील चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि संबधित खात्याच्या सतत बैठका सुरू आहेत. कोरोना आणिबाणी हाताळण्यासाठी केंद्र सरकारने विशेष मंत्रीगट स्थापन केला आहे. तसेच विविध समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांद्वारे बदलत्या परिस्थितीवर कायम नजर ठेवण्यात येत आहे.
24 मार्चला देशभरात 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला नाही. त्यामुळे अनेक राज्यांनी संचारबंदी वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी संचारबंदी वाढणार की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान सर्व राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.