नवी दिल्ली - लॉकडाऊनच्या काळात 835 केसेसवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. यातील 325 प्रकरणांवर निकाल दिला आहे. ११६ सदस्यीय खंडपीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पाडली. यापैकी ४३ खंडपीठांनी मुख्य सुनावणी तर इतर ७३ खंडपीठांनी पुनर्विचार याचिकांवर सुनावणी केली.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेंडिग केसेसबाबत वेबसाईटवर माहिती देण्यात येते. मात्र, १ एप्रिल ते १ मेदरम्यानच्या पेंडिंग केसेसबाबत कुठलेच अपडेट करण्यात आलेले नाहीत. यापूर्वीच्या महिन्यातील पेंडिंग केसेसवर नजर टाकल्यास जानेवारीत ५९,८५९ फेब्रुवारी महिन्यात ५९,६७० तर मार्च महिन्यात ६०,४६९ केसेस सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहेत, अशी माहिती देण्यात समोर आली आहे.