नवी दिल्ली - दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या मनमोहन सिंग यांच्यावरील उपचार यशस्वी झाले आहेत. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासानाने दिली आहे.
मनमोहन सिंग या ८२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बऱ्याच दिवसांपासून कोरोनाशी सुरु असलेला लढा त्यांनी अखेर जिंकला आहे. या वयात कोरोनाची लढाई जिंकणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तसेच कोरोनाच्या इतर रुग्णांसाठी हा एक आशेचा किरण आहे.