कोलकाता– जगभरात कोरोनाचा उद्रेक होत असताना सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशा स्थितीत 80 वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात केली आहे. ही महिला घरी बरी होवून परतल्याने शेजाऱ्यांनी तिचे जोरदार स्वागत केले आहे.
आजीबाईंच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी टाळ्या वाजवून घरी परतल्यानंतर स्वागत तेले. ही आजी स्थानिक लोकांसाठी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा ठरली आहे. मुंबईतही वयाची 100 वर्षे पूर्ण केलेल्या माजी शिक्षकाने कोरोनावर मात केली होती. त्यांचा वाढदिवस आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांनी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात साजरा केला होता.