महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना विषाणू : 'वूहानमध्ये अद्याप 80 भारतीय विद्यार्थी'

कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीयांना विशेष विमानाने भारतात परत आणले आहे. मात्र, तरीही वुहानमध्ये 80 भारतीय विद्यार्थी असल्याची माहिती शुक्रवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

कोरोना विषाणू : 'वूहानमध्ये अद्याप 80 भारतीय विद्यार्थी'
कोरोना विषाणू : 'वूहानमध्ये अद्याप 80 भारतीय विद्यार्थी'

By

Published : Feb 7, 2020, 7:17 PM IST

नवी दिल्ली -चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीयांना विशेष विमानाने भारतात परत आणले आहे. दरम्यान, वुहानमध्ये आणखी 80 भारतीय विद्यार्थी असल्याची माहिती शुक्रवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.


वुहानमध्ये 80 भारतीय विद्यार्थी असून त्यापैकी 70 जण तेथे स्वच्छेने थांबले आहेत. तर इतर 10 जण विमानतळावर आले होते. मात्र, त्यांची तब्येत ठीक नसल्याने चिनी आधिकाऱ्यांनी त्यांना प्रवास करण्यास मनाई केली, असे जयशंकर यांनी सांगितले. तसेच शेजारी देशाच्या विद्यार्थ्यांनाही भारतीय विमानाने चीनमधून भारतात येता येईल, अशी घोषणा आम्ही केली होती. याचा फायदा मालदीवच्या विद्यार्थ्यांनी घेतला, अशी माहिती जयशंकर यांनी दिली.


दरम्यान चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा ६३८ वर पोहोचला आहे. तर, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या नागरिकांचा आकडा तब्बल ३१ हजारावर पोहोचला आहे. त्यामुळे अनेक देशांनी चीनमध्ये जाण्यास आणि चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे.

हेही वाचा -अचानक बॉम्ब स्फोट झाला अन् ब्रिटीश अधिकारी हॉटेलमध्ये सैरावैरा धावला

ABOUT THE AUTHOR

...view details