नवी दिल्ली - कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पूर्ण देश एकवटला आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर पैशांची कमतरता भासू नये म्हणून पीएम रिलीफ फंडमध्ये लोक मदत करत आहेत. यादरम्यान, दिल्लीतील एका आठ वर्षाच्या मुलीने तिच्या पिगी बँकमधील पैसे पीएम रिलीफ फंडमध्ये दान केले आहेत.
दिल्लीतील आठ वर्षीय मुलीने पिगी बँकेतील रक्कम पीएम रिलीफ केयरला केली दान - पीएम रिलीफ फंड
चौथ्या वर्षात शिकणारी एंजल बिडलान पूर्व दिल्लीच्या मयूर विहार फेज1 मध्ये राहते. एंजलने तिच्या पिगी बँकमध्ये 943 रुपये जमा केले होते. ही रक्कम तिने पीएम रिलीफ फंडमध्ये दान केली आहे.
दिल्लीतील आठ वर्षीय मुलीने पिगी बँकेतील रक्कम पीएम रिलीफ केयरला केली दान
चौथ्या वर्षात शिकणारी एंजल बिडलान पूर्व दिल्लीच्या मयूर विहार फेज1 मध्ये राहते. एंजलने तिच्या पिगी बँकमध्ये 943 रुपये जमा केले होते. ही रक्कम तिने पीएम रिलीफ फंडमध्ये दान केली आहे.
एंजल इतरांनाही आवाहन करत आहे, की लोकांनी मदतीसाठी समोर यावे. तसेच आपल्या परिसरात असलेल्या गरजू लोकांना मदत करावी.