महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'या' आठ राज्यांत कोरोनाचे 85 टक्के अ‌ॅक्टिव्ह रुग्ण, तर 87 टक्के मृत्यू

महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या देशातील आठ राज्यांमध्ये 85.5 टक्के कोरोना अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 27, 2020, 10:20 PM IST

नवी दिल्ली -महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूसह 8 राज्यांमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी 85.5 टक्के अ‌ॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण आहेत. तर या आठ राज्यांमध्ये देशातील एकूण मृत्यूंपैकी 87 टक्के मृत्यू झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालायने दिली.

ही माहिती आरोग्य मंत्रालयाने कोरोना संबधी काम पाहणाऱ्या मंत्रीगटाकडे पाठवली असून देशात दिवसाला 3 लाखांपर्यंत कोरोनाच्या चाचण्या घेण्याची क्षमता निर्माण करण्याची तयारी करण्यात यावी, असे म्हटले आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या देशातील आठ राज्यांमध्ये 85.5 टक्के कोरोना अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एकूण मृतांपैकी 87 टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भारतामध्ये 5 लाख कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर आज एकाच दिवसात देशभरात 18 हजार 552 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात एकूण मृत्यू 15 हजार 685 वर पोहोचले आहेत.

कोरोना संसर्गाचे नियंत्रण करण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, साथीचे आजार तज्ज्ञ, वरिष्ठ सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा मिळून मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटाकडून राज्यांना सहकार्य आणि मदत केली जाते. सध्या एक केंद्रीय पथक महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगाणा राज्यामध्ये दौरा करण्यासाठी आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details