गांधीनगर -गुजरातमधील साबरमती मध्यवर्ती कारागृहातील आठ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. एका कैद्याने जामीनावर घरी जाण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यामुळे आधी त्याची कोरोना चाचणी घेतली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे इतरही कैद्यांची चाचणी घेण्यात आली होती.
2019 साली खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या मनुभाई देसाई या कैद्याने जामीन मिळावा यासाठी अहमदाबाद उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. देसाई याची पत्नी आणि मुले अहमदाबादेतील कोरोना कन्टेंन्मेंट झोनमध्ये राहत असल्याचे मुलांची काळजी घेण्यासाठी कोणीही नसून पत्नी आजारी असल्याचे कारण देत जामीनासाठी अर्ज केला होता.