नवी दिल्ली -केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी गुरुवारी भारतीय खाद्य महामंडळाचे (एफसीआय) विभागीय कार्यकारी संचालक आणि सर्व सरव्यवस्थापकांसह व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत त्यांनी कोरोना संकटात केंद्र सरकारकडून लागू केलेल्या योजनांच्या अंमलबजावणी व प्रगतीचा आढावा घेतला. आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 8.00 लाख मेट्रिक टन (एलएमटी) धान्य वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने आतापर्यंत 8.00 लाख मेट्रिक टन धान्य वाटप केले आहे. यामध्ये 2.44 लाख मेट्रिक टन गहू आणि 5.56 लाख मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे. त्यांनी राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांशी समन्वय साधण्याचे व अन्नधान्याचे वाटप वेगवान करण्याचे निर्देशही भारतीय खाद्य महामंडळाला दिले आहेत.