महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेशात १४ तासांत ८ अपघात; १६ जणांचा मृत्यू तर ६५ जखमी

उत्तरप्रदेशात शनिवार हा अपघाताचा वार ठरला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये १४ तासांत ८  अपघात झाले.

accident
अपघात

By

Published : Jan 11, 2020, 3:24 PM IST

लखनौ - उत्तरप्रदेशात शनिवार हा अपघाताचा वार ठरला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये १४ तासांत ८ अपघात झाले, या आठ अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला असून ६५ जण जखमी झाले आहे. यातील बस अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर महोबा येथे झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात थंडीमुळे सगळीकडे दाट धुके पसरले आहे. धुक्यामुळे आग्रा-लखनौ महामार्गावर बस आणि कारचा अपघात झाला. या अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. सर्वांना लखनौमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाट धुक्यामुळे समोरून येणारे वाहन न दिसल्याने हा अपघात झाला आहे.

दुसऱ्या अपघातात शाळेची बस कालव्यात कोसळली. या अपघातात १० विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये एकून २७ विद्यार्थी होते. जखमी विद्यार्थ्यांना कप्तानगंज येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यात आग्रा- दिल्ली महामार्गावर तिसरा अपघात झाला. रस्त्याकडेला शेकोटी पेटवून उबेला बसलेल्या १५ मजूरांना भरधाव कारने चिरडले. यातील १२ जणांचा प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यामध्ये चौथा अपघात झाला. खासगी बस आणि ट्रकची टक्कर होऊन बसला आग लागली. यामध्ये बसमधील १० प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर किमान २२ लोक या अपघातात जखमी झाले आहेत. शहाजहाँपूर जिल्ह्यातील महुआपूर येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने चालकासहीत मागे बसलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
उत्तरप्रदेशात १४ तासांत ८ अपघात
महोबा येथील अपघातात एक चारचाकी झाडाला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
उत्तरप्रदेशात १४ तासांत ८ अपघात
मथुरा जिल्ह्यात एका अज्ञात वाहनाने दोन युवकांना धडक दिली. यामध्ये सूरज नावाच्या ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर सहकारी चरणसिंह गंभीर जखमी झाला आहे. जिल्ह्यातील नगला मेवाती गावादजवळ ही घटना घडली.
उत्तरप्रदेशात १४ तासांत ८ अपघात
सीतापूर जिल्ह्यातील सिधौली येथे राज्य परिवहनच्या बसने एका नऊ वर्षाच्या मुलाला धडक दिली. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. मुलगा आपल्या आजीसोबत यात्रेसाठी गेला होता, तेथून माघारी येताना हा अपघात झाला
उत्तरप्रदेशात १४ तासांत ८ अपघात

ABOUT THE AUTHOR

...view details