नवी दिल्ली -सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) जवळजवळ 75 हजार कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) स्वीकारली आहे. कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
कंपनीच्या व्हीआरएस योजनेसाठी सध्या जवळजवळ एक लाख कर्मचारी पात्र आहेत. तर, कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ दीड लाख आहे. सध्या कंपनीने ७७ हजार कर्मचाऱ्यांनी या पर्यायाची निवड करावी, असे लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या योजनेनुसार, व्हीआरएस घेण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२० निर्धारित करण्यात आली आहे.