महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लडाखमध्ये अडकलेल्या 71 गिर्यारोहकांची सुखरुप सुटका - लडाख मध्ये अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका

गिर्यारोहणासाठी लडाखमधील प्रसिद्ध अशा चादर ट्रेकसाठी हे गिर्यारोहक गेले होते. मात्र अचानक तेथील नदीला पूर आल्याने ते अडकले होते. भारतीय वायू सेनेला या घटनेबद्दल माहिती मिळताच तत्काळ बचाव कार्य हाती घेण्यात आले होते. बचावकार्यादरम्यान 71 जणांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

लडाखमध्ये अडकलेल्या 71 गिर्यारोहकांची सुखरुप सुटका
लडाखमध्ये अडकलेल्या 71 गिर्यारोहकांची सुखरुप सुटका

By

Published : Jan 17, 2020, 12:35 AM IST

लडाख -झंस्कार खोऱ्यातील निराक येथे अडकलेल्या 71 गिर्यारोहकांना भारतीय वायू सेनेच्या एएलएच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे बचाव कार्य सुरू होते.

लडाखमध्ये अडकलेल्या 71 गिर्यारोहकांची सुखरुप सुटका

हेही वाचा -जम्मू-काश्मीर : आणखी पाच नेते कैदेतून मुक्त, ३७० लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर केली होती अटक

गिर्यारोहणासाठी लडाखमधील प्रसिद्ध अशा चादर ट्रेकसाठी हे गिर्यारोहक गेले होते. मात्र अचानक तेथील नदीला पूर आल्याने ते अडकले होते. भारतीय वायू सेनेला या घटनेबद्दल माहिती मिळताच तत्काळ बचाव कार्य हाती घेण्यात आले होते. बचावकार्यादरम्यान 71 जणांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यात 9 फ्रेंच नागरीकांसह चीनी नागरिकांचाही समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details