महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंचकुलामधील गौशाळेत गेल्या 24 तासांत 70 गायींचा मृत्यू

पंचकुलामधील माता मनसा देवी गौशाळामध्ये गेल्या 24 तासांत 70 पेक्षा जास्त गायींचा मृत्यू झाला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी पंचकुलाच्या वेगवेगळ्या गौशालांमध्ये विषबाधामुळे 12 गायींचा मृत्यू झाला होता.

panchkula
panchkula

By

Published : Oct 28, 2020, 5:12 PM IST

पंचकुला (हरयाणा) -गोहत्येचा प्रश्न हा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. यावरून काही मॉबलिंचिंगच्या घटनाही घडल्या आहेत. गायींच्या सुरक्षेवरून अनेक जण राजकारण करताना पाहायला मिळतात. गोहत्या तस्करी रोखण्यासाठी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कायदा केला आहे. मात्र, हा कायदा पुस्तकातच राहिला असून वास्तवात वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. पंचकुलामधील माता मनसा देवी गौशाळामध्ये गेल्या 24 तासांत 70 पेक्षा जास्त गायींचा मृत्यू झाला आहे. चाऱ्यातून विषाची बाधा झाल्यामुळे गायींचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पंचकुलामधील गौशाळेत 70 गायींचा मृत्यू

पशुवैद्यकांचे एक पथक डॉ. अनिल यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करत आहेत. चाऱ्यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणास्तव गायींचा मृत्यू झाला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पथक करीत आहेत. सध्या गायींचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून इतर गायींवर उपचार सुरू आहेत.

गायींना बाजऱ्यातून विषबाधा -

सुमारे दोन महिन्यांपूर्वी पंचकुलाच्या वेगवेगळ्या गौशालांमध्ये विषबाधेमुळे 12 गायींचा मृत्यू झाला होता. गायींना खाण्यासाठी आणलेल्या बाजऱ्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details