महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक! 7 वर्षांच्या मुलाने 6 वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार - Child abuse in Aligarh district

अलिगढ जिल्ह्यात अत्याचाराचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 7 वर्षांच्या मुलाने 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Child abuse in Aligarh district
अलिगड जिल्ह्यात बाल अत्याचार

By

Published : Oct 19, 2020, 12:22 PM IST

अलिगढ - जिल्ह्यातील कुरसी पोलीस स्टेशनअंतर्गत अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 7 वर्षांच्या मुलाने 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना एक आठवडा जुनी असल्याचे सांगितले जात आहे. ही बाब कुटुंबाच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी त्वरित पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.

पोलिसांनी आरोपी मुलाच्या घरी जाऊन चौकशी केली आहे. आरोपी मुलाविरुद्ध क्वार्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज आरोपी मुलाच्या वयानुसार वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

12 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगी घराच्या दारात खेळत होती. खेळतांना तिचा बॉल शेजारच्या घरी गेला. मुलगी बॉल घेण्यासाठी शेजारच्या घरात गेली असता तेथील मुलाने तिला बाथरूममध्ये नेऊन अत्याचार केला, असा आरोप केला जात आहे. घटनेनंतर मुलीने कुणाला काहीच सांगितले नाही. जेव्हा तिला वेदना होऊ लागल्याने आईने विचारणा केल्यावर सर्व प्रकार समोर आला.

आज बालन्याय मंडळामध्ये मुलाला हजर करण्यात येईल. दुष्कर्म आणि पॉस्को कायद्यान्वये पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details