श्रीनगर (ज.का)- जिल्ह्यातील 7 पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. हे सातही पोलीस घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आले होते. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सातही पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले.
श्रीनगर येथील सात पोलिसांचे विलगीकरण; कोरोना असल्याचा संशय.. - Srinagar police corona
कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 7 पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. इतर पोलिसांचे स्वॅब नमुने देखील जमा केल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे
रैनावरी भागातील कलाई-अंदर येथील एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली होती. ही व्यक्ती आपल्याला मारहाण करतो अशी तक्रार त्याच्या पत्नीने नौहाट्टा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. मात्र, सोमवारी रात्री या व्यक्तीला ताप आणि खोकला सुरू झाला. त्यामुळे, पोलिसांनी त्याचे स्वॅब नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविले. चाचणीत रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर, या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 7 पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. इतर पोलिसांचे स्वॅब नमुने देखील जमा केल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.