महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये विषारी वायू गळती, सात जण गंभीर जखमी - वायू गळती बातमी

शक्ती पेपर मिलमध्ये विषारी वायूची गळती झाल्याने सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वाना संजीवनी नर्सिंग होम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 7, 2020, 3:33 PM IST

Updated : May 7, 2020, 3:58 PM IST

रायपूर- छत्तीसगडमधील रायगढ जिल्ह्यातील तेतला गावामध्ये विषारी वायूगळती झाली आहे. शक्ती पेपर मिलमध्ये विषारी वायूची गळती झाल्याने सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना संजीवनी नर्सिंग होम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशाखापट्टनम येथे आज पहाटे झालेल्या गॅस गळतीत १० जणांचा मृत्यू झाला. १२ तासांच्या आत देशात दुसरी गॅस गळतीची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे.

छत्तीसगडमध्ये विषारी वायू गळती, सात जण गंभीर जखमी

यातील तिघांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रायपूरमधील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रायगढ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आणि संतोष सिंह आणि जिल्हाधिकारी यशवंत कुमार यांनी जखमींची भेट घेतली आहे. मील मालकाने घटना लपविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वायू गळती झाल्याची माहिती दिली नाही, त्यामुळे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिक्षक सिंह यांनी सांगितले.

Last Updated : May 7, 2020, 3:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details