रायपूर - जिल्ह्यातील मंदिर हसौद पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. संबंधित बस ओडिशाहून गुजरातच्या दिशेने मजूरांना घेऊन जात होती. या भीषण अपघातात सात मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून 20 जण जखमी आहेत.
सर्व अपघातग्रस्त मजूरांना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शनिवारी पहाटे 3.30 च्या दरम्यान झाला आहे. अपघाताची भीषणता इतकी होती की धडकल्यानंतर एका मजूराचा मृतदेह ट्रकच्या छतावर पडला होता. ट्रक जप्त करण्याची कारवाई सुरू असताना पोलिसांना या मजुराचा मृतदेह नजरेस पडला.