महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारताच्या ७ मच्छीमारांना श्रीलंकन नौदलाने केली अटक

रामेश्वरम आणि जवळपासच्या परिसरातील मच्छीमार काछाथीवू बेटाजवळ मासेमारी करत असताना श्रीलंकंन नौदलाच्या गस्त घालणाऱ्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

रामेश्वरम

By

Published : Jul 29, 2019, 9:21 AM IST

Updated : Jul 29, 2019, 9:54 AM IST

रामेश्वरम (तामिळनाडू) - भारताच्या ७ मच्छीमारांना द्विपक्षीय बेटाच्या सीमेवर मासेमारी केल्याप्रकरणी श्रीलंका नौदलाने रविवारी अटक केली आहे. रामेश्वरम आणि जवळपासच्या परिसरातील मच्छीमार काछाथीवू बेटाजवळ मासेमारी करत असताना श्रीलंकन नौदलाच्या गस्त घालणाऱ्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या बोटीही जप्त करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेतील वृत्तपत्रांनी दिली आहे.

आमच्या समुद्री भागातील माशांचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आणि श्रीलंकन मासेमारांना पुरेसे मासे उपलब्ध व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यामुळे या भागात मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छीमाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याचे श्रीलंकेच्या नौदलाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या २५ जुलै रोजीही समुद्रीसीमा पार करून श्रीलंकेच्या भागात प्रवेश केलेल्या ४ भारतीय मच्छीमारांना अटक करण्यात आली होती.

Last Updated : Jul 29, 2019, 9:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details