भोपाळ - मध्यप्रदेशच्या सतनामध्ये ट्रक आणि गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री ही घटना झाल्याची माहिती आहे.
मध्य प्रदेशमध्ये अपघातात सात जणांचा मृत्यू , 5 जण जखमी - मध्य प्रदेश सटना अपघात अपडेट
मध्य प्रदेशमधील सतनामध्ये ट्रक आणि गाडीचा अपघात झाला असून त्यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मध्य प्रदेश अपघात
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे.
रेवा जिल्ह्यातील रहिवासी असून ते एका कार्यक्रमावरून घरी परतत होते. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. वेगाने येत असलेल्या कारने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. यापूर्वी 7 नोव्हेंबरला एक ट्रक उलटल्याने 15 जण जखमी तर 4 जणांचा मृत्यू झाला होता.