नवी दिल्ली - नोएडाच्या सेक्टर 8 जवळील बांस बल्ली भागामध्ये आज कोरोनाचे सात संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. हे सर्वजण झारखंडचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
सेक्टर आठ भागात काही कोरोना संशयित असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्वांना घरातून बाहेर काढत त्यांची माहिती लिहून घेतल्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्यांना नेण्यात आले.
मात्र, या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे की, नाही हे त्यांची चाचणी केल्यानंतरच समजणार आहे. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोठेही संशयित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस व वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचून त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन रुग्णालयात चाचणी केली जात आहे.
नोएडामध्ये सात कोरोना संशयित रुग्ण सापडले दरम्यान, भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३,०३० अॅक्टिव रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जवळपास २६७ लोकांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच देशात कोरोनामुळे ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.