नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता देशात उद्या सहाव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात ७ राज्यातील ५९ लोकसभा मतदार संघांसाठी १२ मे रोजी मतदान होईल. यामध्ये एकूण ९७९ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार तब्बल १५ टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने या उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केला. त्यावर एक नजर...
सहाव्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये उभ्या असलेल्या ९७९ उमेदवारांपैकी ९६७ उमेदवारांचा एडीआरने अभ्यास केला. उरलेल्या १२ उमेदवारांचे शपथपत्र स्पष्ट नसल्यामुळे त्यांना या अहवालातून वगळण्यात आले आहे. सर्व ९७९ उमेदवारांपैकी १७४ उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांतील आहेत. तर, ६५ उमेदवार हे स्थानिक पक्षांतील आणि ४३० मान्यता प्राप्त नसलेले मात्र नोंदणीकृत पक्षातील आहेत.
एडीआरने या गुन्ह्यांचे ८ भागात वर्गीकरण केले आहे. त्यावरुन त्यांनी उमेदवारांची टक्केवरी ठरवली. यात सामान्य गुन्हे, गंभीर गुन्हे आणि दोषसिद्ध झालेले उमेदवार, हत्या, हत्येचा प्रयत्न करणारे आणि अपहरणाचा आरोप असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय यात महिलांवर अत्याचार करणारे आणि उग्र भाषण करणाऱ्या उमेदवारांचाही समावेश आहे. गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांची संख्या - सहाव्या टप्प्यामध्ये रिंगणात असलेल्या ९७९ उमेदवारांपैकी १४६ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे एकूण १५ टक्के उमेदवार, असे आहेत की त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे म्हणजे काय ?
एडीआरने गंभीर गुन्हे ठरवण्यासाठी काही मापदंड ठरवले आहेत. त्यानुसार
१. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले उमेदवार.
२. अजामीनपात्र गुन्हे.
३. निवडणुकींशी संबंधीत गुन्हे.
४. सरकारी खजिन्याला नुकसान पोहोचवण्याचा अपराध.
५. हल्ला, हत्या, अपहरण आणि बलात्कार या सारखे गुन्हे.
६. लोक प्रतिनिधींच्या अधिनियमातील गुन्हे.
७. भ्रष्टाचार निरोधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असेलेले उमेदवार गंभीर गुन्ह्यांच्या यादीत मोडतात.
लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे; 'हा' पक्ष आघाडीवर
सहाव्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये उभ्या असलेल्या ९७९ उमेदवारांपैकी ९६७ उमेदवारांचा एडीआरने अभ्यास केला. उरलेल्या १२ उमेदवारांचे शपथपत्र स्पष्ट नसल्यामुळे त्यांना या अहवालातून वगळण्यात आले आहे. सर्व ९७९ उमेदवारांपैकी १७४ उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांतील आहेत. तर, ६५ उमेदवार हे स्थानिक पक्षांतील आणि ४३० मान्यता प्राप्त नसलेले मात्र नोंदणीकृत पक्षातील आहेत.
गुन्हे दाखल असणारे उमेदवार -
उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार ९६७ उमेदवारांपैकी १८९ म्हणजे २० टक्के उमेदवारांनी आपल्यावर सामान्य गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे. दोष सिद्ध झालेले उमेदवार - ४ उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर दोष सिद्ध झाले आहेत. हत्येशी संबंधीत उमेदवार - सहाव्या टप्प्यातील ९६७ उमेदवारांपैकी ६ उमेदवारांवर हत्येचा गुन्हा दाखल आहे. म्हणजेच त्यांच्यावर भादंवि कलम ३०२ उंतर्गत गुन्हे दाखल आहेत. हत्येचा प्रयत्न करणारे उमेदवार - २५ उमेदवारांवर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. म्हणजेच या उमेदवारांवर भादंवि कलम ३०७ नुसार खटला चालत आहे. अपहरणाशी संबंधित उमेदवार - ९६७ उमेदवारांपैकी ५ उमेदवारांनी आपल्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे घोषित केले आहे. त्यांच्यावर भादंवि ३६३ (अपहरण) आणि ३६४ (अपहरणासाह खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. महिलांवर अत्याचार करणारे उमेदवार - महिलांवर बलप्रयोग करणे, त्या स्त्रीच्या पती आणि कुटुंबीयांना त्रास देणे तसेच विनयभंग करण्यासारखे गुन्हे यामध्ये मोडतात. यामध्ये २१ उमेदवार असे आहेत ज्यांच्यावर यावरून खटला सुरू आहे. उग्र भाषण देणारे उमेदवार - तब्बल ११ उमेदवारांनी उग्र भाषण देण्याचे गुन्हे दाखल असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.
कोणता पक्ष वरचढ - लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यामध्ये पक्षाच्या आधारावर अभ्यास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस आणि बसप या पक्षांचा समावेश आहे. भाजपच्या ५४ उमेदवारांपैकी १८ म्हणजे-च ३३ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. तर, काँग्रेसमधील ४६ पैकी १२ म्हणजे २६ टक्के उमेदवारांवर सामान्य गुन्हे दाखल आहेत. बसपवर नजर टाकली तर ४९ पैकी १७ म्हणजेच ३५ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. तर, ३०७ अपक्ष उमेदवारांपैकी २७ म्हणजे ९ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत.
सामान्य गुन्हेगारीमध्ये ५४ उमेदवारांपैकी २६ म्हणजेच ४८ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर, काँग्रेसमधील ४६ पैकी २० म्हणजेच ४४ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. बसपवर नजर टाकली तर १६ पैकी ५ म्हणजेच ३१ टक्के उमेदवारांच्या नावावर गुन्ह्याची प्रकरणे आहे. तर, ३०७ अपक्षांपैकी ३४ म्हणजे ११ टक्के उमेदरवारांवर सामान्य गुन्ह्यांची प्रकरणे आहेत.
एकंदरीत राष्ट्रीय स्तरावरील पक्षांमध्ये भाजपने सर्वात जास्त गुन्हेगारांना तिकीट दिले आहे. त्यामुळे सहाव्या टप्प्यात भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे.