महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चिंताजनक.. दिल्लीत आणखी ६८ सीआरपीएफ जवान कोरोना पॉझिटिव्ह - CRPF jawans found corona positive

शहरातील ६८ सीआरपीएफ जवान कोरोनाबाधित असल्याचे निष्पण्ण झाले आहे. हे जवान ईस्ट दिल्लीतील त्या तुकडीतले आहेत ज्यामध्ये या पूर्वीदेखील कोरोनाचे रुग्ण आढळले होते.

CRPF jawans found corona positive
सीआरपीएफ जवान

By

Published : May 2, 2020, 3:13 PM IST

नवी दिल्ली- शहरातील कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आरोग्य आणि पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच आता सीआरपीएफचे जवान देखील कोरोनाच्या तावडीत सापडत आहेत. शहरातील ६८ सीआरपीएफ जवान कोरोनाबाधित असल्याचे निष्पण्ण झाले आहे. हे जवान ईस्ट दिल्लीतील त्या तुकडीतले आहेत ज्यामध्ये या पूर्वीदेखील कोरोनाचे रुग्ण आढळले होते.

आतापर्यंत या तुकडीतील १२२ जवान कोरोनाबाधित आहेत. तसेच, सीआरपीएफमधील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे. त्यातील १ जवान कोरोनामुक्त झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिल्लीत सध्या 'अ‌ॅक्टिव्ह' कोरोनाग्रस्तांची संख्या ही २ हजार १० इतकी आहे, तर कोरोना संक्रमणाची एकूण प्रकरणे ही ३ हजार ७३८ एवढी आहेत.

हेही वाचा-सावधान..! फेक लिंकवरून आरोग्य सेतू अ‌ॅप डाऊनलोड करू नका

ABOUT THE AUTHOR

...view details