हैदराबाद- गणपती उत्सव जवळ आला असून तेलंगणाच्या हैदराबाद स्थित खैरताबाद महागणपती दरवर्षी भाविकांसाठी आकर्षण ठरत आला आहे. खैरताबाद महगणपती मंडळ नेहमीच गणपतीच्या विशेष मूर्ती भाविकांसाठी सजवत असते. यावेळी मंडळाने 12 मुखी गणपती बनवला असून त्याची उंच्ची तब्बल 61 फूट आहे. त्यामुळे हा महागणपती चर्चेचा विषय ठरला आहे.
हैदराबादमधील 61 फूटाचा बारा मुखी खैरताबाद महागणपती तयार! - KHAIRATABAD GANESH IDOL news
खैरताबाद महगणपती मंडळ नेहमीच गणपतीच्या विशेष मूर्ती भाविकांसाठी सजवत असते. यावेळी मंडळाने 12 मुखी गणपती बनवला असून त्याची उंच्ची तब्बल 61 फूट आहे.
खैरताबाद महागणपती
12 मुखी गणपतीचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले असून सध्या पेंटिंगचे काम सुरु आहे. या महिन्याच्या 26 तारखेपर्यंत गणपती पूर्णपणे तयार होईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. उत्सव समितीच्या म्हणण्यानुसार या महोत्सवात यंदा 6 लाखाहून अधिक भाविक आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे. या महागणपतीच्या उभारणीसाठी 1 कोटीचा खर्च झाला असून गणपती साकार करण्यासाठी देशभरातून अनेक कारागिर बोलवण्यात आले आहेत.