महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश की अत्याचार प्रदेश: शिक्षकाचा सहा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग - Rape cases in UP

उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जहानाबाद पोलीस स्टेशन परिसरात सकाळी कोचिंग शिकण्यासाठी गेलेल्या सहा वर्षाच्या मुलीवर बरोबर शिक्षकाने घृणास्पद कृत्य केले.

Torture of a six-year-old girl
सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार

By

Published : Oct 27, 2020, 7:59 AM IST

Updated : Oct 27, 2020, 8:19 AM IST

उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जहानाबाद पोलीस स्टेशन परिसरात सकाळी कोचिंगसाठी गेलेल्या सहा वर्षाच्या मुली बरोबर एका शिक्षकाने अतिप्रसंग केला. ही विद्यार्थिनी दुसरीमध्ये शिकत होती. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकास अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात केली. धर्मेंद्र मौर्य, असे आरोपीचे नाव आहे.

गावातच शिकवत होता आरोपी

जहानाबाद पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात सहा वर्षाची मुलगी आपल्या मित्रासह गावातील धर्मेंद्र मौर्य नावाच्या शिक्षकाकडे शिकवणीसाठी गेली होती. यावेळी शिक्षकाने एका मुली बरोबर अशोभनीय कृत्य केले. त्यानंतर ती मुलगी आपल्या घरी परतली. पण धर्मेंद्रने दुसरी मुलगी पकडली. त्याने तिच्यावर अत्याचार केला. मुलगी रडत तिच्या घरी आली तेव्हा लोकांना घटनेची माहिती मिळाली. परंतु आरोपी फरार झाला. या घटनेची नोंद पोलिसांकडे केली आहे. त्यावर पोलीस निरीक्षक हरीश वर्धन सिंह पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

हेही वाचा-'हाथरस प्रकरणात सीबीआय चौकशीमधून सत्य बाहेर येईल'

उत्तर प्रदेश की अत्याचार प्रदेश?

यापुर्वी हाथरस येथे मुलीवर अत्याचार करून तिला मारण्यात आले होते. कुटुंबाच्या परवानगीशिवाय रात्रीच्या वेळी पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश की अत्याचार प्रदेश? असा प्रश्न उपस्थित होतो. त्या घटने नंतरही उत्तरप्रदेशातील अत्याचार कमी होण्याचे नाव नाही.

हेही वाचा-हाथरस प्रकरणी भाजप गप्प का? दिग्विजय सिंग यांचा सवाल

Last Updated : Oct 27, 2020, 8:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details