दिंडोरी - कोरोना विषाणूच्या संकटाविरोधात मदत करण्यासाठी समाजातील अनेक लोक सरसावले आहेत. यात मध्य प्रदेशातील एका सहा वर्षीय चिमुरडीने सहभाग घेतला आहे. कनिका जैन असे नाव असलेल्या या मुलीने आपल्या पीगी बँकमध्ये साठवलेले पैसे मदत म्हणून दिले आहेत.
भुकेल्यांसाठी चिमुरडीचा पुढाकार; साठवलेले पैसे केले दान - मध्य प्रदेश कोरोना अपडेट
कोरोना विषाणूच्या संकटाविरोधात मदत करण्यासाठी समाजातील अनेक लोक सरसावले आहेत. यात एका सहा वर्षीय चिमुरडीने सहभाग घेतला आहे. तिने आपण साठवलेले पैसे पोलिसांना दिले आहेत.
कनिका जैन
कनिकाचे वडील सोनू जैन रेडियम आर्टचे काम करतात. ते कनिकाला खाऊसाठी पैस देत. कनिकाने मागील दोन वर्षांपासून हे पैसे आपल्या पीगी बँकमध्ये साठवण्यास सुरुवात केली. आता कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक गरीब नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कनिकाने आपली जमा केलेली रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने ३ हजार ७५१ रुपये गरिबांच्या जेवणासाठी पोलिसांकडे दिले आहेत. पोलिसांनी देखील या चिमुरडीचे कौतुक केले असून त्यांनी तिचा गौरव केला