नवी दिल्ली -नोएडातील गौतम बुद्ध नगरमधील 6 खासगी प्रयोगशाळेमध्ये बनावट कोरोना चाचण्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खासगी लॅबमध्ये चाचणी घेण्यापूर्वी संबंधित लॅब आयसीएमआर प्रमाणित आहे की नाही, ते तपासण्याचे आवाहन सीएमओ डॉ दीपक ओहरी यांनी केले आहे.
गौतम बुद्ध नगरचे सीएमओ डॉ दीपक ओहरी म्हणाले की, गेल्या काही दिवसांत काही खासगी प्रयोग शाळेत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ज्या आयसीएमआर प्रमाणित नाही. संबधीत लॅब टेक्नीशियनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
लॅब टेक्नीशियनने केलेल्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्याच लोकांच्या चाचण्या एनआईबीने पुन्हा घेतल्यानंतर निगेटिव्ह आल्या आहेत. लाइफलाइन, स्टार इमेजिंग, मॉर्डन यांच्यासह इतर लॅबमध्ये बनावट कोरोना चाचण्या घेण्यात येत होत्या.
कोरोना चाचणी घेणार्या सर्व प्रयोगशाळांच्या नावांची माहिती आयएमसीआरच्या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच गौतम बुद्ध नगरमध्ये नोएडा मेडिकल सायन्स, एनआयबीमध्ये कोरोना टेस्टची सुविधा आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सेंट्रल लॅब शारदा रुग्णालय ग्रेटर नोएडा, जेपी रुग्णालय नोएडा सेक्टर -128 मध्येही कोरोना टेस्ट केली जात आहे.