नांदेड -एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहतात. आता त्यांनी त्यांच्या मुस्लीम भाऊबंदांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. '२०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले. या दोन्ही वेळेस त्यांना ६ टक्के मुस्लिमांनी मतदान केले. हे '६' काय आहे? क्रिकेटच्या भाषेत '६'ला 'छक्का' असे म्हटले जाते,' असे विधान ओवेसी यांनी केले आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ओवेसी यांनी त्यांच्या भाषणातून मोदी सरकारवर तोफ डागली आहे. सोबतच त्यांनी मोदींना २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या मुस्लिमांवरही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. यावर भाजपचे अमित मालवीय यांनीही ट्विटद्वारे टीका केली आहे.