पणजी - कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर आज (दि. 2 जून) सकाळी 6 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे गोव्यात अॅक्टीव रुग्णसंख्या घटून 23 झाली आहे. गोव्यात आतापर्यंत 50 जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
यावेळी, कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एडविन, डॉ. इरा, आरोग्य संचालक, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस जीवदान देण्याचे काम सुरू आहे. रुग्णांनी आजारावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना आरोग्यदायी घोषित करणे आम्हाला अधिक बळ आणि कोरोना विषाणूवर एकत्रित मात करण्यासाठी प्रेरित करत राहते.
गोव्यात सहा जण कोरोनामुक्त; अॅक्टीव रुग्णसंख्या 23 - गोव्यात आज सहा कोरोनामुक्त
गोव्यात आज सकाळी 6 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील अॅक्टीव रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे.
1 जून रोजी सायंकाळपर्यंत गोव्यात 73 कोरोनाबाधित होते. ज्यामधील अॅक्टीव रुग्णसंख्या 29 होती. तर 44 जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. सोमवारी (दि. 1 जून) दिवसभरात 1 हजार 289 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी 1 हजार 37 अहवाल प्राप्त झाले. ज्यामध्ये 2 सकारात्मक तर 1 हजार 35 नकारात्मक अहवाल आले. उर्वरीत 1 हजार 78 अहवालांची प्रतीक्षा आहे. 29 जानेवारीपासून 1 जूनपर्यंत एकूण 20 हजार 780 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेत. ज्यामधील 19 हजार 702 अहवाल तपासणीनंतर प्राप्त झाले. सोमवारी (दि. 1 जून) 18 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना तर 22 आंतरराज्य प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्यात आले.
हेही वाचा -धक्कादायक ; कोरोनाबाधिताची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या