महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 22, 2019, 11:57 PM IST

ETV Bharat / bharat

पाकिस्तानातून ६ वर्षांपूर्वी भारतात आलेल्या हिंदू कुटुंबाला भारत सोडण्याची नोटीस

६ वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात आलेल्या १९ जणांच्या कुटुंबीयांपैकी ६ जणांना भारत सोडण्याची नोटीस मिळाली आहे. या कुटुंबातील महिलांनी इशारा दिला आहे की, त्या सर्व पाकिस्तानात जाण्यापेक्षा मरणे पसंत करतील. त्या त्यांचे पती किंवा इतर कोणालाही पाकिस्तानात परत जाऊ देणार नाहीत आणि स्वतःही परत जाणार नाहीत.

हिंदू कुटुंबाला भारत सोडण्याची नोटीस

जोधपूर -पाकिस्तानच्या राहमियार जिल्ह्यातील एका गावात राहणारे एक हिंदू कुटुंब 6 वर्षांपूर्वी पाकिस्तानात होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून जोधपूरला पोहोचले. मात्र, इतक्या वर्षांनंतरही त्यांना भारताचे नागरिकत्व मिळू शकले नाही. या कुटुंबाने जोधपूरचे जिल्हा प्रशासन आणि सीआयडीवर आरोप केला आहे की, त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आश्वासन देऊन जोधपूरला बोलावण्यात आले. मात्र, हे आश्वासन कधीही पूर्ण केले नाही.

सीआयडीने पुन्हा एकदा या कुटुंबाला भारताचे नागरिकत्व देण्यासाठी जोधपूरला बोलावले. मात्र, नागरिकत्वाऐवजी या कुटुंबातील ६ जणांच्या हाती भारत सोडून जाण्याची नोटीस देण्यात आली. तसेच, त्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आले. या कुटुंबातील 19 जणांपैकी ज्या 6 जणांना भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे, तेच संपूर्ण कुटुंबाचे संगोपण करणारे आहेत. यामुळे या कुटुंबासमोर संकट ओढवले आहे.

पाकिस्तानातून ६ वर्षांपूर्वी भारतात आलेल्या हिंदू कुटुंबाला भारत सोडण्याची नोटीस

हेही वाचा - आलिया गावात अजब वरात.... हेलिकॉप्टरने थेट वधूच्या दारात!

पाकिस्तानमधून थोडे-थोडे जण जोधपूरच्या व्हिसावर भारतात येऊन शेवटी हे संपूर्ण कुटुंब कामानिमित्त जैसलमेरच्या नाचना येथे स्थायिक झाले. माझे हे व्हिसाच्या नियमाचे उल्लंघन असल्याचे सांगत सीआयडी सीबीने त्यांना परत पाकिस्तानात पाठवण्याची तयारी सुरू केली. पाकिस्तानात आपल्यावर अत्याचार होत होते म्हणून आम्ही सर्वजण भारतात आलो. तरीही येथील प्रशासन आम्हाला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्याच्या प्रयत्नात आहे, असे या कुटुंबातील महिलांचे म्हणणे आहे.

या कुटुंबातील महिलांनी इशारा दिला आहे की, त्या सर्व पाकिस्तानात जाण्यापेक्षा मरणे पसंत करतील. त्या त्यांचे पती किंवा इतर कोणालाही पाकिस्तानात परत जाऊ देणार नाहीत आणि स्वतःही परत जाणार नाहीत, असे या महिलांनी म्हटले आहे. ज्या ६ लोकांना भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे, त्यांच्यामध्ये काजल नावाची एक तरुणी आहे. तिचे भारतामध्ये लग्नही ठरले आहे. मात्र, आता तिला तिच्या वडिलांसह भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे.

या कुटुंबाने आपल्याला भारतातच राहू द्यावे, अशी मागणी भारत सरकारकडे केली आहे. गुरुवारी जोधपूर जिल्हाधिकारी कार्यालयात या संपूर्ण कुटुंबाने अक्षरशः ढसाढसा रडत ही मागणी केली. त्यांना भारत सोडण्याचे आणि कुटुंबापासून दूर होण्याचे दुःख आहे. हे कुटुंब पाकिस्तानातील धार्मिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचारांपासून सुटका मिळेल या आशेवर 6 वर्षांपूर्वी भारतात आले होते.

हेही वाचा - राजस्थानातील मयंक सिंह बनला देशातील सर्वांत तरुण न्यायाधीश

या कुटुंबातील १९ सदस्य ६ वर्षांपूर्वी त्यांच्या भारतातील नातेवाईकांकडे रहावयास आले. ते जोधपूर, जैसलमेर परिसरात मोल-मजुरी करून पोट भरत होते. मात्र, अचानकपणे सीआयडी जोधपूरने गृह मंत्रालयाच्या आदेशाचा हवाला देत या कुटुंबाचा प्रमुख, कमावती मुले आणि एका मुलीवर व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला आहे. या सर्वांना तत्काळ प्रभावाने भारत सोडण्याचे फरमान जारी केले आहे. आता हे पीडित कुटुंब सीआयडी कार्यालय, जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मदतीसाठी विनवणी करत आहे. मात्र, या प्रकरणी सीआयडी अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details