महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रयागराजमध्ये बारा तासात तब्बल 6 हत्या; 8 आरोपींना अटक - प्रयागराजमध्ये बारा तासात 6 हत्या

धूमनगंज ठाणे क्षेत्रातील हद्दीत मध्यरात्री जमिनीच्या वादातून ३ जणांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली आहे. तसेच यातील काही आरोपी फरार असून त्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे मोठे आव्हाने पोलिसांसमोर आहे.

प्रयागराज

By

Published : Aug 20, 2019, 12:36 PM IST

प्रयागराज- प्रयागराजमध्ये 12 तासाततब्बल ६ हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी जमिनीच्या वादातून तर, काही ठिकाणी लुटमारीसाठी हत्या केल्याचे उघड झाले आहे. यात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रयागराजमधील कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच येथील नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे.

धूमनगंज हत्येप्रकरणी आठ आरोपींना अटक -

धूमनगंज ठाणे क्षेत्रातील हद्दीत मध्यरात्री जमीन वादातून झालेल्या वादातून तीन जणांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. तसेच यातील काही आरोपी फरार असून त्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे मोठे आव्हाने पोलिसांसमोर आहे.

अटक केलेले आरोपी -

बलवंत सिंह, अजीत सिंह,चंदन सिंह, सोनल सिंह, कुसुम लता, मंजरी, रचना सिंह, मनीष शुक्ला

हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पोलिसांना केले निलंबित -

12 तासात सहा जणांच्या हत्या करण्यात आल्याने प्रयागराज हादरले आहे. याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी त्या भागातील पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीतील पोलिसांचे निलंबन केले असल्याची माहिती एसएसपी अतुल शर्मा यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details