लखनऊ- निजामुद्दीनच्या मरकज येथील कार्यक्रमातून आलेल्यांपैकी 6 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आग्र्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 20 वर गेली आहे. पण, शासकीय आकडेवारीनुसार हा आकडा 18 सांगण्यात येत आहे. आणखी सात जणांचा अहवाल येणार असून आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.
आग्र्यात कोरोनाबाधितांची संख्या 20 वर, आकडा वाढण्याची भीती - agra
निजामुद्दीनच्या मरकज येथील कार्यक्रमातून आलेल्यांपैकी 6 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आणखी सात जणांचा अहवाल येणार असून येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश कुमार वत्स म्हणाले, मरकज येथील कार्यक्रमातून आलेल्या सहा जणांचा अहवाल सकारात्मक आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मरकज येथून आलेल्यापैंकी 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर हा आकडा 18 झाला. पण, आग्र्याचे रहीवासी असलेले एक डॉक्टर व त्यांच्या मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा आकडा 20 वर गेला. मात्र, त्यांच्यावर गुडगाव येथील रूग्णालयात इलाज सुरू आहे. त्यामुळे या दोघांचा समावेश आग्र्याच्या आकडेवारी करायचा की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
हेही वाचा -'मिस्टर कोरोना'शी भाजप आमदाराने साधला संवाद; आमच्या जगातून निघून जा, केली मागणी