बंगळुरु - देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आज(मंगळवारी) केरळमध्ये कोरोनाचे नव्याने सहा रुग्ण सापडले आहेत. तर कर्नाटकामध्ये ४ रुग्ण आढळले आहेत. केरळ राज्यामध्ये आता १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर संपूर्ण देशभरामध्ये ५५ पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
कोरोनाचा कहर...! केरळात ६ तर कर्नाटकात कोरोनाचे ४ नवे रुग्ण; कुटुंबियांवरही देखरेख - कोरोना बातमी
कोरोनाच्या धोक्यामुळे केरळमध्ये सातवी पर्यंत शाळा मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये मॉल, सिनेमागृहांवरही बंधने लागू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांमध्ये खबरदारीच्या उपायांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

केरळमध्ये आणखी सहा रुग्ण सापडले असून एकून रुग्णांची संख्या १२ झाल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली. तर कर्नाटकात ४ रुग्ण सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना वेगळ्या विभागामध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामल्लू यांनी दिली.
कोरोनाच्या धोक्यामुळे केरळमध्ये सातवीपर्यंत शाळा मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये मॉल, सिनेमागृहांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांमध्ये खबरदारीच्या उपायांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.