नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील इटावामध्ये पीक-अप आणि ट्रकमध्ये टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 6 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर 1 जण गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
युपीच्या इटावामध्ये पीकअप-ट्रकचा भीषण अपघात; 6 शेतकऱ्यांचा मृत्यू, 1 जखमी - इटावा न्यूज
उत्तर प्रदेशमधील इटावामध्ये पीक-अप आणि ट्रकमध्ये टक्कर झाल्याने भीषण रस्ता अपघात झाला आहे. यामध्ये 6 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर 1 जण गंभीर जखमी आहे.
फ्रेंड्स कॉलनी ठाण्याअंतर्गत क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला आहे. भरधाव आलेल्या ट्रकने पीक-अपला धडक दिल्याने अपघात झाला. पीक-अपमध्ये असलेल्या 6 शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. हे शेतकरी जिल्हा बाजारात फणस विक्रीसाठी घेऊन जात होते. याप्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाप्रती दु:ख व्यक्त केले आहे. मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख तर जखमी शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.