श्रीनगर -पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये आज(शुक्रवार) सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात सीमेवरील 6 नागरिक जखमी झाले आहेत. मोर्टार तोफा आणि इतर शस्त्रांद्वारे पाकिस्तानने गोळीबार केल्याचे भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सांगितले.
कुपवाडात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात 6 नागरिक जखमी - कुपवाडा पाकिस्तान गोळीबार
तांगधर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील विविध भागांत पाकिस्तानी सैन्याने लहान आणि मोठ्या शस्त्रांनी गोळीबार केला. यात 6 नागरिक जखमी झाले.
तांगधर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील विविध भागांत पाकिस्तानी सैन्याने लहान आणि मोठ्या शस्त्रांनी गोळीबार केला. यात 6 नागरिक जखमी झाले. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय लष्कराने जशाच तसे उत्तर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तांगधर आणि रंगवाडा भागात प्रत्येकी तीन नागरिक जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
पाकिस्तानने आज सकाळी कुपवाडा मधील नौगाम भागातही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या सोबतच पुंछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये सकाळी साडेसहाच्या दरम्यान शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. अलिकडील काही दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन वाढले असून सीमेवरील शांतता भंग झाली आहे. अनेक जवान शहीद झाले असून सर्वसामान्य नागरिक गोळीबारात मारले गेले आहेत. या वर्षी आत्तापर्यंत लष्कारने दिडशे पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.