महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान; केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे मोठे नेते रिंगणात - Amethi

पाचव्या टप्प्यामध्ये बिहारच्या ५ जागांवर आणि जम्मू-काश्मीरच्या दोन जागांसाठी मतदान होईल. त्याबरोबरच झारखंडच्या ४, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी ७ आणि राजस्थानच्या १२ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त म्हणजे १४ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

5th phase

By

Published : May 6, 2019, 12:10 AM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आटोपल्यानंतर आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात ७ राज्यांतील एकूण ५१ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. तसेच एकूण ६७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे, ज्यांच्यावर संपूर्ण देशाचे लक्ष राहील.

पाचव्या टप्प्यामध्ये बिहारच्या ५ जागांवर आणि जम्मू-काश्मीरच्या दोन जागांसाठी मतदान होईल. त्याबरोबरच झारखंडच्या ४, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी ७ आणि राजस्थानच्या १२ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त म्हणजे १४ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

उत्तर प्रदेश -
उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त म्हणजेच १४ जागांवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार. यात एकूण १८२ उमेदवार निवडणूक लढत आहेत. त्यापैकी लखनौ, रायबरेली, अमेठी आणि बहराईच या मतदारसंघात सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत. कारण येथून दिग्गज नेते रिंगणात तर आहेतच मात्र, या त्यांच्या पारंपरिक जागा असल्यामुळे मतदार कोणाच्या बाजुने कौल देतील यावर लक्ष लागून असणार आहे.

  • लखनौ -
    राजनाथ सिंह आणि पूनम सिन्हा

लखनौ लोकसभा मतदार संघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह मैदानात आहेत. येथे समाजवादी पक्ष, बसप आणि राष्ट्रीय लोक दलाने आघाडी केल्यामुळे राजनाथ सिंहांना मोठी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. तसेच येथून काँग्रेसच्या तिकिटावर आचार्य प्रमोद कृष्णम मैदानात आहेत. त्यांच्यासाठी साधू संत मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत.

  • रायबरेली -
    सोनिया गांधी आणि दिनेश प्रताप सिंह

या मतदार संघात सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ)च्या अध्यक्षा सोनिया गांधी मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे दिनेश प्रताप सिंह मैदानात आहेत. रायबरेलीवर तब्बल ४ वेळा सोनिया गांधींचा कब्जा होता. या निवडणुकांमध्ये बसप-सपा आघाडीने उमेदवार न दिल्यामुळे त्यांच्यासाठी यावेळी निवडणूक लढने सोपे असले तरी, भाजपचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

  • अमेठी -
    राहुल गांधी आणि स्मृती इराणी

अमेठी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतःहा मैदानात आहेत. त्यांची ही पारंपारीक जागा आहे. मात्र, असे असतानाही त्यांच्यासमोर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आव्हान आहे. मागच्या वेळी स्मृती इराणी यांना परावभव स्विकारावा लागला होता. यावेळी मात्र, जनता कोणाच्या पारड्यात मत टाकणार यावर सर्व अवलंबून आहे. राहुल गांधी यांनी यावेळी पहिल्यांदाच कर्नाटकच्या वायनाड येथूनही निवडणूक लढवली आहे.

  • बहराईच -

बहराईच लोकसभा मतदारसंघातून भाजपला राम राम ठोकलेल्या सावित्रीबाई फुले काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यावरही देशाचे लक्ष लागून राहणार आहे. कारण मागच्या काळात त्यांनी भाजप सोडण्यापूर्वी पक्षावर अनेक आरोप प्रत्यारोप केले होते. त्यामुळे येथूनच खासदार असलेल्या सावित्रीबाईला जनता मतदान करेल का, हा मोठा प्रश्न तयार झाला आहे.

राजस्थान -

कृष्णा पूनिया आणि राज्यवर्धन सिंह राठोड

राजस्थान येथील १२ लोकसभा मतदारसंघामध्ये पाचव्या टप्प्यातील निवडणुका पार पाडल्या जाणार आहेत. त्यामध्ये एकूण १३४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील जयपूर ग्रामिण या जागेवर सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण या लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर केंद्रीय मंत्री आणि ऑलम्पिक पदक विजेते राज्यवर्धन सिंह राठोड मैदानात आहेत. तर, त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर ऑलम्पिक खेळाडू कृष्णा पुनिया मैदानात आहेत. त्यामुळे येथील सामन्यात तुल्यबळाची स्थिती निर्माण झाली आहे.

बिहार -
बिहार येथे पाचव्या टप्प्यामध्ये ५ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाचही मतदारसंघात ८२ उमेदवार निवडणूक लढत आहेत. येथे भाजपने नितीश कुमार यांचे जनता दल (युनाईटेड) आणि रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाशी आघाडी केली आहे. तर, लालू प्रसाद यादव तुरुंगवास भोगत असताना त्यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेस, माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि शरद यादव यांच्या लोकतांत्रीक पक्षाशी आघाडी केली आहे.

बिहार येथे सितामढी, मधूबनी, मुझफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर या ५ मतदारसंघांचा पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत समावेश आहे. यापैकी सारण लोकसभा मतदार संघात सर्वांचे लक्ष लागून आहे. येथून भाजपचे वरिष्ठ नेते राजीव प्रताप रूडी मैदानात आहेत. ते यावेळी येथून चौका लावण्याच्या प्रयत्न करतील. मात्र, त्यांना लालू प्रसाद यादव यांचे व्याही आणि तेज प्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका रॉय आरजेडीच्या पक्षावर रिंगणात आहेत. त्यामुळे येथील लढत चांगलीच रंगणार आहे. विशेष म्हणजे तेज प्रताप यादव यांनी आपल्याच सासऱ्यांच्या विरोधात उमेदवार उतरवला आहे.

जम्मू काश्मीर -

जम्मू - काश्मीर येथे या टप्प्यामध्ये २ जागांवर मतदान होणार आहे. येथे एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. जम्मू काश्मीरात सुरक्षेचा मुद्दा समोर ठेऊन सातही टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यामध्ये अनंतनाग या मतदारसंघावर देशाचे लक्ष लागून आहे. येथून जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रेटीक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती रिंगणात आहेत. यापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या वेळी पीडीपी आणि भाजपने आघाडी केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि मुफ्ती एकमेकांविरोधात लढत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details