नवी दिल्ली -कोरोनाबाबत काहीशी दिलासादायक बातमी आली आहे. देशात गेल्या चोवीस तासात ५७ हजार ३८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हा आतापर्यंतचा उच्चांकी आकडा असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यातील १२ राज्यांचा दर तर देशाच्या दरापेक्षाही जास्त आहे. आतापर्यंत एकूण १८ लाख ८ हजार ९३६ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह बाधित रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यादरम्यान असलेले अंतर वाढले आहे (११ लाख ४० हजार ७१६), असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.