पटणा -बिहार पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ५७ विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण विविध देशांतील असून ते तबलिगी जमातशी संबंधित आहेत. त्यांनी व्हिसाच्या नियमांचे देखील उल्लंघन केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केलीय. पटना, बक्सर, किशनगंज आणि आरारियातून त्यांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेले तबलिगी जमातच्या कार्यक्रमात उपस्थित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पटन्यातून 17, आरारियातून 18, बक्सर आणि किशनगंजमधून प्रत्येकी 11 जणांना अटक करण्यात आले. या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जमातशी कनेक्शन असणारे 57 विदेशी नागरिक ताब्यात; व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई - Bihar Government
बिहार पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ५७ विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण विविध देशांतील असून ते तबलिगी जमातशी संबंधित आहेत. त्यांनी व्हिसाच्या नियमांचे देखील उल्लंघन केल्याचे समोर आल्याने संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
किशनगंज पोलीस अधीक्षक कुमार अशिष यांनी अटक करण्यात आलेल्यांपैकी दहाजण इंडोनेशियाचे नागरिक असल्याची माहिती दिली. तसेच यामध्ये एका मलेशियन नागरिकाला खांका मशिदीतून ताब्यात घेण्यात आले आहे. याचप्रमाणे नवीन भोजपूर आणि बक्सरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत सात इंडोनेशियन आणि चार मलेशियन नागरिकांचा समावेश आहे.
बक्सर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपेंद्रनाथ वर्मा यांनी संबंधित व्यक्ती प्रवासी व्हिसावर देशात आल्याची माहिती दिली. तसेच ते धर्मप्रसारासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. दिल्लीतीन तबलिगी जमातच्या कार्यक्रमात देखील त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या सर्वांना मार्च महिन्यात भोजपूर येथील मशिदीतून ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. क्वरंटाईन पिरेड संपल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संबंधितांना अटक करण्यात आले असून त्यांना कोर्टात हजर केले आहे. यामध्ये 18 फॉरेनर्स, नऊ मलेशियन आणि नऊ बांगलादेशी नागरिकांना अरारियातून अटक करण्यात आली. उर्वरित अठरा फॉरेनर्सपैकी नऊ जण अरारियातील जामा मशिदीत होते. तर अन्य नऊ जणांना नरपतगंज येथील रेवाही मशिदीतून ताब्यात घेण्यात आले. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.