महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दाबोळी विमानतळावर विदेशी नागरिकांकडून ५६ लाखांचे सोने जप्त - daboli airport goa

गोवा एअर कस्ट विभागाने एप्रिल 2019 पासून आतापर्यंत 104 लाख 85 हजार किंमतीचे सोने जप्त केले असल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कस्टम विभागाने जप्त केलेले सोने

By

Published : Jul 22, 2019, 10:26 PM IST

पणजी -दाबोळी विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातून आलेल्या तजाकिस्तानच्या नागरिकांकडून 1 किलो 787 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. याची किंमत तब्बल 56 लाख 38 हजार असल्याचे सांगितले जात आहे. गोवा कस्टम विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.

तजाकीस्तान येथील दुशांबेमधून ३ महिला प्रवासी एअर इंडियाच्या एआय 994 या दुबई मार्गे येणाऱ्या तजाकिस्तान-गोवा आंतरराष्ट्रीय विमानातून प्रवास करीत होत्या. गोवा विमानतळावर उतरताच त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी अंतरवस्त्रे, पिशवी आणि पर्समध्ये 1 किलो 787 ग्रॅम सोन असल्याचे आढळून आले. त्यानंतर गोवा विमागाच्या एअर कस्टम विभागाचे प्रमुख डॉ. राघवेंद्र पी. यांच्या मार्गदर्शनाखाली हे सोने जप्त करण्यात आले.

गोवा एअर कस्ट विभागाने एप्रिल 2019 पासून आतापर्यंत 104 लाख 85 हजार किंमतीचे सोने जप्त केले असल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details