हैदराबाद- देशात काल (4 जुलै) 52 हजार 50 कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 18 लाख 55 हजार 745 झाला आहे. तसेच, कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 12 लाखाच्या पार गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 12 लाख 30 हजार 509 झाली आहे. देशात सध्या 5 लाख 86 हजार 298 सक्रिय रुग्ण आहेत. तर 803 कोरोना रुग्णांचा काल (4 जुलै) मृत्यू झाला आहे. त्यामुळे, एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 38 हजार 938 झाली आहे.
मुंबईत काल 709 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्र- मुंबईत काल (4 जुलै) कोरोनाचे 709 नवे रुग्ण आढळून आले असून 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 18 हजार 130 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 546 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 873 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 90 हजार 962 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 20 हजार 326 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 77 टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवसांवर पोहोचला आहे.
दिल्लीत काल 674 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
दिल्ली- दिल्लीत काल 674 नवे कोरोना रुग्ण सापडले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राजधानीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 39 हजार 156 झाली आहे. काल 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने दिल्लीतील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 4 हजार 33 झाली आहे.
मध्यप्रदेशमध्ये 588 पोलिसांना कोरोना