नवी दिल्ली- कर्नाटक, केरळसह देशातील अनेक राज्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळ राज्यामध्ये मृतांचा आकडा ५१ वर पोहोचला आहे. तर कर्नाटकमध्ये ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. हवाई दल, नौदल आणि आपत्ती निवारण पथकाद्वारे पूराच्या पाण्यात अडलेल्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह हवाई मार्गाने कर्नाटकातील पूरपरिस्थीतीचा आढावा घेणार आहेत.
केरळमधील ८ जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. कर्नाटकातील १७ जिल्ह्यांना पुरग्रस्त घोषित करण्यात आले आहे. कर्नाटकातील सुमारे ८० तालूके पुरामुळे प्रभावित झाले आहेत. रायचूर जिल्ह्यामध्ये हवाई दलाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत अडकेलल्या नागरिकांना बाहेर काढले. बेळगाव जिल्ह्यातही ३ हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे ३७ जणांना वाचवण्यात आले.