नवी दिल्ली - मागील 24 तासांत देशभरात 508 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 789 झाली आहे. यातील 4 हजार 312 अॅक्टिव्ह केसेस असून 353 जण बरे झाले आहेत. देशभरात 124 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतात मागील 24 तासांत 508 रुग्णांची वाढ; 13 जणांचा मृत्यू - कोरोना लाईव्ह न्यूज
4 हजार 312 अॅक्टिव्ह केसेस असून 353 जण बरे झाले आहेत. देशभरात 124 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
![भारतात मागील 24 तासांत 508 रुग्णांची वाढ; 13 जणांचा मृत्यू corona update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6701720-652-6701720-1586269296353.jpg)
कोरोना अपडेट
तर मुंबईमध्ये 100 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून आज दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईमध्ये 590 कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
विविध राज्यातील परिस्थिती
- पंजाबमध्ये 8 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 99 झाली आहे.
- हरियाणात 33 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 129
- उत्तर प्रदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या 324 झाली असून आज 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
- केरळराज्यात आज 9 रुग्ण आढळून आले.
- तामिळनाडूत 69 आणखी कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण 690
- पश्चिम बंगालमध्ये 8 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 69
- महाराष्ट्रात तब्बल 150 नव्या रुग्णांची वाढ, एकूण कोरोनाग्रस्त 1 हजार 18