रायपूर- छत्तीसगढमध्ये गेल्या दोन वर्षात निमलष्करी दलासह 50 सुरक्षा जवानांनी आत्महत्या केली आहे. विधानसभेत बुधवारी गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी याची माहिती दिली. कौटुंबिक समस्या किंवा आरोग्य समस्या या कारणाने या आत्महत्या झाल्या आहेत.
हेही वाचा-दिल्ली हिंसा : पोलिसांकडून हेल्पलाईन क्रमांक जारी , 106 जणांना अटक तर 18 जणांवर एफआयआर दाखल
भाजपचे आमदार अजय चंद्रकर यांनी याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री ताम्रध्वज साहू म्हणाले की, सहकाऱ्याची हत्या केल्याच्या (fratricide) प्रकरणात 8 जणांचा मृत्यू झाला. तर राज्य आणि निमलष्करी दलाच्या जवानांसह 50 पोलीस कर्मचार्यांनी 2018 पासून आतापर्यंत आत्महत्या केली आहे.
याशिवाय इंडो तिब्बेटीयन सीमा पोलीस (आयटीबीपी) मधील सहा जवानांसह आठ सुरक्षा कर्मऱ्यांचाही भ्रातृहत्या (fratricide) मध्ये मृत्यू झाला आहे.
2018 मध्ये 22, 2019 मध्ये 26, या वर्षी 2 सुरक्षा कर्मचार्यांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी नक्षलग्रस्त बस्तर विभागातील सहा जिल्ह्यांमधील 18 प्रकरणे आहेत. बहुतेक आत्महत्याच्या प्रकरणांमध्ये कौटुंबिक समस्या किंवा आरोग्य समस्या, असे कारण असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.