महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तब्बल 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा जत्था भारतात दाखल - पाकिस्तानी हिंदू

पाकिस्तानमधून तब्बल 50 हिंदू कुटुंबांचा जत्था  वाघा सिमेवरून भारतामध्ये आला आहे.

तब्बल 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा जत्था भारतात दाखल
तब्बल 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा जत्था भारतात दाखल

By

Published : Feb 3, 2020, 8:52 PM IST

नवी दिल्ली -नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. यातच पाकिस्तानमधून तब्बल 50 हिंदू कुटुंबांचा जत्था वाघा सिमेवरून भारतामध्ये आला आहे. ही सर्व जण हरिद्वार येथील गंगेत अंघोळ करण्यासाठी आले असल्याची माहिती आहे.

पाकिस्तान आणि भारतादरम्यान असलेल्या वाघा सिमेवरून तब्बल 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंब भारतामध्ये आली आहेत. कायदेशीर प्रकिया पूर्ण करून हे सर्व जण 25 दिवसांच्या व्हिसावर भारतामध्ये आली आहेत. हरिद्वार येथील गंगेत अंघोळ करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. नियमानुसार व्हिसा संपल्यानंतर त्यांना पाकिस्तानात परत जावे लागणार आहे. दरम्यान आपली परत पाकिस्तानमध्ये जाण्याची इच्छा नसून मला भारतामध्ये राहायचे आहे. हरिद्वार येथील गंगेत स्नान केल्यानंतर मी भविष्यावर विचार करेल, असे पाकिस्तानातून आलेले लक्ष्मण दास यांनी सांगितले. दरम्यान कोणत्याही देशामध्ये व्हिसा संपल्यानंतर तिथे राहणे बेकायदेशीर आहे.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details