महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शिमला फिरायला गेलेल्या युवकांची गाडी दरीत कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू - हरियाणातील तरुणांचा कार अपघातात मृत्यू

हरियाणा राज्यातून हिमाचल प्रदेशातील शिमला येथे फिरायला आलेल्या युवकांची गाडी दरीमध्ये कोसळली. या अपघातात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आहे.

हिमाचल प्रदेश
कार अपघात

By

Published : Dec 22, 2019, 1:57 PM IST

शिमला - हरियाणा राज्यातून हिमाचल प्रदेशातील शिमला येथे फिरायला आलेल्या युवकांची गाडी दरीमध्ये कोसळली. या अपघातात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आहे. ३०० फूट खोल दरीत गाडी कोसळल्याने गाडीचा चक्काचूर झाला आहे.

रविवारी सुट्टीच्या दिवशी हरियाणावरून शिमला पाहण्यासाठी सर्वजण कारमधून आले होते. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यामधील कंडाघाटात कार अनियंत्रित झाल्याने गाडी दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. कंडाघाट येथील डेडघराट गावाजवळ ही घटना घडली.

सकाळी एक स्थानिक व्यक्ती जंगलामध्ये गवत आणण्यासाठी गेला असता त्याला दरीत गाडी पडल्याचे दिसले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. कार चक्काचूर झाली असून कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

शनिवारी सर्वजण हरियाणामधून हिमाचलप्रदेशमध्ये फिरायला आले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला. ५ जणांचा मृत्यू झाल्याचे सोलनचे पोलीस अधिक्षक शिव कुमार शर्मा यांनीही सांगितले आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details