महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कारची ट्रकला जोरदार धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश - 5 person died in road accident in dhanbad

धनबादहून जामताडाकडे जाणाऱ्या कारने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ट्रक हा मालाने भरलेला होता. कारची धडक इतकी जोरदार होती की कारमधील पाचही जण ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलांसह दोन पुरूष आणि एक महिलेचा समावेश आहे. एक जण या अपघातात जखमी आहे. त्यावर उपचार सुरू आहेत. गोविंदपुर-साहिबगंज हाइवेवर हा अपघात झाला.

accident
कारची ट्रकला जोरदार धडक

By

Published : Nov 2, 2020, 9:02 AM IST

धनबाद (झारखंड) - जिल्ह्यातील लटानी या ठिकाणी आज (सोमवार ) सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. तर कारचा चालक हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारची ट्रकला जोरदार धडक

कार ने दिली ट्रकला धडक

धनबादहून जामताडाकडे जाणाऱ्या कारने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ट्रक हा मालाने भरलेला होता. कारची धडक इतकी जोरदार होती की कारमधील पाचही जण ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलांसह दोन पुरूष आणि एक महिलेचा समावेश आहे. एक जण या अपघातात जखमी आहे. त्यावर उपचार सुरू आहेत. गोविंदपुर-साहिबगंज हाइवेवर हा अपघात झाला.

अपघात वार

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात ही आज (सोमवार) पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे या मार्गावरिल वाहतूक ठप्प झाली होती. त्याच बरोबर आंध्र प्रदेशातील कडपा इथे झालेल्या अपघातात चार जण जिंवत जळाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचासारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन कारसह एक ट्रक जळून खाक झाला आहे. कडपा उपनगरातील विमानतळा जवळ हा अपघात आज (सोमवारी ) पहाटे झाला.

हेही वाचा - स्कॉर्पिओची ट्रकला धडक, ४ जण जिंवत जळाले, ३ गंभीर

हेही वाचा- उत्तर प्रदेशात भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, 10 जण गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details