महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गांजा विक्री करणाऱ्या ५ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अटक; हैदराबाद पोलिसांची कारवाई - Engineer Students Smuggling Ganja

गांजाची विक्री करणाऱ्या अभियांत्रिकीच्या ५ विद्यार्थ्यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. हे विद्यार्थी अरकू आणि आंध्रप्रदेशच्या सीमेजवळ कमी किमतीत गांजा खरेदी करून ते शहरात अधिक किमतीत विकत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गांजा विक्री करणाऱ्या ५ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अटक

By

Published : Aug 18, 2019, 1:23 PM IST

Updated : Aug 18, 2019, 1:34 PM IST

हैदराबाद- सायबराबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अभियांत्रिकी आणि आयटी विद्यार्थ्यांना गांजाची विक्री करणाऱ्या ५ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शुक्रवारी अटक करण्यात आले आहे. हैदराबाद पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास ८ किलोग्रॅम गांजा जप्त केले आहे.

गांजा विक्री करणाऱ्या ५ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी. भानूतेजा रेड्डी, डी. साई नरेश, के. अखिल, शेख नय्यीम आणि के. साईकुमार असे अटक केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे आरोपी अरकू आणि आंध्रप्रदेशच्या सीमेजवळ कमी किमतीत गांजा खरेदी करून ते शहरात अधिक किमतीत विकत.

आरजीआय पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामकृष्णा यांनी सांगितले, की शुक्रवारी शमशाबादजवळ आमचे पथक वाहतूक तपासणी करत असताना दोन विद्यार्थी संशयास्पदरित्या एक बॅग नेताना आढळले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ असलेल्या गांजा आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर आरोपींना हा सर्व प्रकार तसेच यामध्ये समावेश असलेल्या इतर तिघांची नावे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्वरित इतर आरोपींनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या आरोपींना शनिवारी न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Aug 18, 2019, 1:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details