भदोई - उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यात रुग्णवाहिकेच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील गोपालगंज परिसरात एका रस्त्यावर उभ्या ट्रकवर भरधाव वेगातील रुग्णवाहिका आदळली. या अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशात रुग्णवाहिकेच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू - उत्तर प्रदेशात रुग्णवाहिकेच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू
ही रुग्णवाहिका राजस्थानातील चित्तोडगड येथून पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे निघाली होती. मात्र, वाटेत उत्तर प्रदेशात भीषण अपघातात सापडली.
उत्तर प्रदेशात रुग्णवाहिकेच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू
ही रुग्णवाहिका राजस्थानातील चित्तोडगड येथून पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे निघाली होती. मात्र, वाटेत उत्तर प्रदेशात भीषण अपघातात सापडली. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णवाहिका भरधाव वेगात होती. त्यातच दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याच्या बाजूला उभी केलेली ट्रक न दिसल्याने अपघात झाला. चालकासह रुग्णवाहिकेत बसलेले पाच प्रवासी ठार झाले आहेत.