राजगड (मध्यप्रदेश)- राजगड जिल्ह्याच्या सारंगपूर शहराजवळ गोपालपुरा बायपासवर दोन चारचाकी वाहनांमध्ये समोरा-समोर धडक होऊन एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत.
ही घटना आज (दि. 22 जून) सकाळी घडली. एक चारचाकी वाहन गुना येथून इंदूरकडे जात होती. त्याचवेळी महाराष्ट्रातून लखनऊच्या दिशेने जाणाऱ्याला चारचाकी वाहनाला गुनाकडून येणाऱ्या वाहनाने समोरा-समोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्थांनिक लोकांच्या मदतीने जखमींना जवळील सारंगपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.